नमस्कार मंडळी


माझं नाव राहुल पाटील, पण लोक मला अमेरिकन भाऊ म्हणून ओळखतात. माझा जन्म महाराष्ट्रातल्या एका छोट्या खेडे गावात झाला : धाडणे, ता. साक्री, जि. धुळे. माझे वडील सेंट्रल गव्हर्नमेंट बँकेत काम करायचे, त्यामुळे मी लहानपणी दर चार-पाच वर्षांनी नवीन ठिकाणी. त्या वेळी स्वाभाविक हे अवघड वाटायचं, पण आता तो वेगवेगळ्या संस्कृती आणि विचारांचा अनुभव मला फार महत्वाचा वाटतो.

शाळेत मी एकदम गुणी, बारावीच्या बोर्डात राज्यात अकरावा नंबर वगैरे. BITS पिलानीमधून कॉम्प्युटर्सची डिग्री घेतल्यानंतर मी अमेरिकेत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून आलो. करिअरच्या सुरुवातीलाच वाटलं की स्वतःचं काहीतरी करायचंय. नऊ ते पाच ची ती नोकरी मला कधीच पटली नाही, आणि त्यामुळे आपला वेळ कसा कंट्रोल करता येईल यावर माझी नजर.

कोविडनंतर मी सहा महिने sabbatical घेतली - Atlassian ने मला ही संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप आभार. मला वाटतं की जास्तीत जास्त कंपन्यांनी असा ब्रेक द्यायला हवा. ह्या काळात मी भरपूर ट्रॅव्हल केलं, पुस्तकं वाचली, आणि थोडाफार विचार पण केला. ह्या दरम्यान मला उमगल, काहीतरी नवीन चॅलेंज पाहिजे.

मग काय, मी माझ्या बायकोसोबत - जी माझी बिझनेस पार्टनर पण आहे - YouTube चालू केलं. आम्ही अजूनही सॉफ्टवेअर कन्सल्टिंग करतो, पण आम्हाला खरी मज्जा येते 'अमेरिकन भाऊ' साठी कंटेंट बनवण्यात.

तुमची स्टोरी तुम्हाला आमच्या प्रेक्षकां सोबत शेअर करायची आहे? तुमचा ब्रँड तुम्हाला जगातल्या मराठी प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा आहे? विचार काय करताय, contact कराच.

तुमचा,
अमेरिकन भाऊ

ps : आम्हाला AI लय आवडत, सगळे फोटो AI generated, म्हणून "तो मी नव्हेच !"

भेटूयात लवकरच

तुमचे विचार ऐकून आणि कमेंट्स वाचून मला खूप छान वाटतं. काही विचारायचं असेल, सांगायचं असेल, माहिती द्यायची असेल किंवा फक्त Hi म्हणायचं असेल तर नक्की काँटॅक्ट करा.

माझ्या सगळ्या सोशल नेटवर्क्सवर मला फॉलो करायला विसरू नका.